आम्ही आोपन सोर्सवर बनलो आहोत

एलिमेंटरी अोएस प्लॅटफाॅर्म फ्री आणि अोपन सोर्सच्या मजबूत पायावर बनला आहे. यांसारख्या प्रकल्पांशिवाय एलिमेंटरी आोएस अस्तित्वात येवू शकली नसती.

सुरक्षा आणि गोपनियता

अोपन सोर्स असल्याने एलिमेंटरी अोएस सर्वोत्तम सुरक्षा आणि गोपनीयतेच्या बाबतीत इतर क्लोज्ड सोर्स सोफ्टवेअरपेक्षा फायदेशीर ठरते. जेव्हा सोर्सकोड आॅडिटकरिता उपलब्ध असतो, कम्युनिटीमधील कुणीही — सुरक्षा संशोधक असो, संबंधीत वापरकर्ता असो किंवा मूळ उपकरण निर्माता असो जो त्यांच्या हार्डवेअर सोबत अोएस पुरवतो — खात्री करू शकतात की, सोफ्टवेअर सुरक्षित आहे आणि वैयक्तिक माहिती गोळा करून इतरत्र पाठवत नाहीये.

विकसकांसाठी उत्तम

जर आपले अॅप सिस्टीम API किंवा एखादे वैशिष्ट्य जे अद्याप उपलब्ध नसेल त्यासाठी उपयुक्त ठरू शकत असेल, तर आपण ते वैशिष्ट्य ओएसमध्ये लिहिण्यात मदत करू शकता. त्याचप्रमाणे, आपण एलिमेंटरी ओएसमध्ये वैशिष्ट्य किंवा डिझाइन नमुना कसे बनविले याबद्दल उत्सुकता बाळगू शकता. अंदाज घेण्याऐवजी किंवा तो पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आपण एका निश्चित उत्तरासाठी अंतर्निहित स्रोत कोड पाहू शकता.

सहभागी व्हा

आम्ही मुक्त स्रोत प्रकल्पांना समर्थन देतो

आम्ही ज्या प्रकल्पांवर अवलंबून असतो अशा प्रकल्पांना परत निधी पाठवण्यासाठी एलिमेंटरी भर देते. जेव्हा आपण एलिमेंटरी ओएसची एक प्रत खरेदी करताय, तेव्हा आपण यासारख्या उत्कृष्ट प्रोजेक्टसना देखील समर्थन देत असता.

येथे वैशिष्ट्यीकृत सर्व लोगो त्यांच्या संबंधित प्रकल्पांचे ट्रेडमार्क आहेत.