काहीतरी मोठे बनविण्यात सहभागी व्हा

ते सर्वकाही जे आम्ही बनवतो 100% ओपन सोर्स आहे आणि जगभरातील लोकांनी परस्पर सहयोगातून विकसित केले आहे. तुम्ही जरीही प्रोग्रॅमर नसाल, तरीही तुम्ही सहभागी होऊ शकता आणि काही करू शकता.

निधी

तुमच्या मदतीने, आम्ही हौशी स्वयंसेवकांच्या छोट्या गटापासून वाढून एक छोटी कंपनी बनलो आहोत. प्रत्येक छोटीशी मदत आणखी एका पूर्णवेळ विकसकाच्या भर्तीच्या दिशेने एक पाऊल ठरेल.

पॅट्रिन

पॅट्रिन एका क्राऊडफंडिंग मीहिमेसारखे काम करते. रक्कम निवडा, बक्षिसे मिळवा आणि आम्हाला आमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करा. अधिक माहिती

पॅट्रन बना

सहजपणे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा PayPal अकाऊंट वापरा. तुम्ही वन-टाइम पेमेंट निवडू शकता किंवा रिकरींग पेमेंट सेटअप करू शकता.

आम्हाला आर्थिक मदत करा, शिवाय तुमच्या मित्र, परिवार आणि सहकार्‍यांना खास elementary बद्दल सांगून तुमचा आधार दर्शवू शकता.

भंडाराला भेट द्या
बाऊण्टीसोर्स

बाऊण्टीसोर्स विकसकांना फिक्सेस कमिट केल्याबद्दल किंवा नवीन फीचर्स तयार केल्याबद्दल बक्षिसे देऊन निधी थेट त्यांच्या हाती ठेवतात.जे इश्यू तुमच्या करिता महत्वाचे आहेत त्यावर बक्षीस सेट करा किंवा ठराविक अनुप्रयोगाला निधी द्या. तुम्ही रिकरिंग सबस्क्रिप्शन देखील सेट अप करू शकता. अधिक माहिती

भाषांतरे

एलिमेंटरी ओएस जगभरातील लोकांनी तयार केली आणि वापरली आहे; तिचे अधिक भाषांमध्ये भाषांतर करून हा अनुभव वृद्धिंगत करण्यात आम्हाला मदत करा.

एलिमेंटरी ओएस आणि आमचे संकेत स्थळ दोन्ही देखील Weblate नावाचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरुन मुक्तपणे भाषांतरित केले जातात. अधिक माहिती

जगाचा नकाशा

सहाय्य

प्रश्न आणि उत्तर

स्टॅक एक्सचेंज ही सामान्य प्रश्नांची सर्वोत्कृष्ट उत्तरे शोधून काढलेली एक Q&A वेबसाइट आहे. विचारणे आणि उत्तर देणे प्रारंभ करण्यासाठी कोणीही खाते तयार करू शकते.

दस्तऐवज

एलिमेंटरी वापरकर्ते व विकसक दोघांनाही मूलभूत दस्तऐवज पुरवते. आमचा संपूर्ण दस्तऐवज Markdown मध्ये लिहिला आहे आणि GitHub वर ठेवलेला आहे, बदल किंवा नवा विभाग दाखल करणे अत्यंत सोपे आहे.

वेब विकसक

आमचे संकेत स्थळ HTML, CSS, PHP आणि JavaScript वापरुन बनले आहे. आम्ही नेहमीच या क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या शोधात असतो जे त्यात योगदान देवून ते अधिक चांगलं बनवतील.

डेस्कटॉप डेव्हलपमेंट

आमचे डेस्कटॉप एनवायरनमेंट आणि त्यातील सर्व अनुप्रयोग Vala, GTK+, Granite आणि इतर अनेक मुक्त लायब्ररीजच उपयोग करून बनले आहेत. आम्ही आमची डेस्कटॉप आज्ञावली GitHub वर ठेवतो, जी ओपन सोर्स प्रकल्पांसाठी मोफत सुविधा आहे. जेआर तुम्ही यापूर्वी कधीच एलिमेंटरी ओएस साठी डेवलप केले नाही, आम्ही तुम्हाला आमचे Getting Started guide वाचण्याची शिफारस करतो. अधिक माहिती

डिजाइन

आमची डिजाइन टीम कल्पनांना स्पष्ट समस्या अहवालांमध्ये आणि पोचपावतीच्या मालमत्तेत बदलते. सुरुवात करण्यापूर्वी आमच्या डिजाइन वर्कफ्लो बद्दल वाचण्याची शिफारस केली जातेय. अधिक माहिती